ironmanआयर्नमॅन या गोष्टीची सुरुवात कशी झाली , "तयारी पासून ते या गोष्टीचा सुंदर शेवट(या स्पर्धेचा) यातील लहानसहान अनुभव आणि घडामोडी आयुष्यात खूप काही बदल घडवून आणतात , त्यातील काही आठवतं आणि जाणवतंय आजपर्यंत, ते वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय" : 16 डिसेंबर 2017 चेन्नई ट्रायथलॉन पार पडली ज्या स्पर्धेमध्ये 4 किलोमीटर पोहणे + 180 किलोमीटर सायकलिंग + 42 किलोमीटर रनिंग हे सर्व18 तासात करण्याचे आवाहन मी 8 मिनिटे उशिर केला(18.08तास). आणि मनाला खूप मोठा चटका बसला, का उशीर झाला याची खूप कारणे आहेय त्यातील एक माझी सायकल घसरली,पळतांना कुत्रा चावला आणि राहिले साहिलें साप दिसला म्हणून परत घाबरून पडलो हे जरी होते तरी शास्त्रीय कारण माझी अपुरी तयारी आणि निःकाळजीपणा तो असा , एकतर स्पर्धेच्या खूप आधी म्हणजे कमीतकमी चार दिवस आधी तरी गेले पाहीजे होते ते एक दिवस आधी गेलो ,तिथे गेल्यावर सायकल घेतली मित्राची ती घेऊन हॉटेल वर तिथून डेकॅथलॉन मधून पेडल क्लिट सारखे गोष्टी अचानक लावून घेऊन मग तिथून खूप अंतरावर असलेले ठिकाण म्हणजे स्पर्धेचे ठिकाण ,या सर्वामध्ये खूप दमछाक झाली , समुद्रकि...